५५ वर्षात कधीही न हरलेले जगज्जेते गामा पैलवान

आजवर या कुस्तीपंढरीने लाखो मल्ल घडवले. कोल्हापूरातील यशस्वी मल्लांची जर नावे विचारली तर त्यांची यादी बरीच मोठी होईल.

याच यादीत अगदी अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे गामा पैलवान ‘The Great Gama’ या नावाने ते जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या ५५ वर्षाच्या कुस्ती करियर मध्ये जगभरातील एकही मल्ल त्यांना हरवू शकला नव्हता. हि गोष्ट काही सामान्य नाही. म्हणूनच जगज्जेता हि त्यांची पदवी आजही सार्थ आहे.

२२ मे १८८१ रोजी दतीया ( अमृतसर ) या गावी गामांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव मोहोम्मद गुलाम हुसेन असे होते. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तत्कालीन कुस्ती चॅम्पियन पै.रहिमबक्ष सुलतानीवाला व आफताब-ए-हिंद पै. गुलाम मोईद्दीन यांच्याशी त्यांची कुस्ती बरोबरीत सुटली, यामुळे कुस्तीक्षेत्रात त्यांचा दबदबा निर्माण झाला. या गामांचा खुराकहि असाच अविश्वसनिय आहे.

६ गावरान कोंबड्या, १० लिटर दूध, अर्धा लिटर तूप, अर्धा किलो बदाम, पाव किलो रबडी, जिलेबी, बकऱ्याच्या हाडाची आकनी असा त्यांचा आहार होता. व्यायामही तसाच प्रचंड, ५००० जोर आणि ५००० बैठका, पोहणे, धावणे आणि रोज ३ तास कुस्तीचा सराव.

 

१९१० साली ‘वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप’ हि स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत ऐनवेळी गामांचा सहभाग नाकारला गेला. यावर गामानी तेथे उपस्थित सर्व मल्लाना आव्हान दिले ” जो कोणी माझ्यासमोर ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकून दाखवेल त्याला मी ५ पौंड बक्षीस देईन. पहिल्यांदा ३ मल्ल पुढे आले, नंतर १२…. पण २ मिनिटांपेक्षा जास्त कोणीही त्यांच्यापुढे टिकू शकला नाही. लंडन मधील वर्तमानपत्रांमध्ये गामांचा उदोउदो झाला. लोकांच्या दबावामुळे आयोजकांना गामांना स्पर्धेत प्रवेश दिला गेला. त्याकाळी पोलंड चा झेबिस्को हा जगज्जेता पदावर विराजमान होता. त्यानुसार आयोजकांनी १० सप्टेंबर १९१० रोजी झेबस्को वि गामा हि निकाली कुस्ती जाहीर केली, ठरलेल्या वेळी कुस्ती सुरु झाली. दोन्हीही मल्ल एकमेकांना भारी पडत होते, संपूर्ण जगाचे लक्ष या कुस्तीकडे लागले होते. तब्बल २तास ३५ मिनिटे चाललेल्या हि कुस्ती अंधार होऊ लागल्यामुळे थांबवण्यात आली.

पुन्हा ८ दिवसांनी हि कुस्ती जाहीर केली गेली, पण ठरलेल्या वेळी झेबिस्को उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे गामाना जगज्जेता जाहीर करण्यात आले. व ‘बुल-टेस्ट-बेल्ट’ व चांदीची गदा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यानंतर झेबिस्कोने पुन्हा एकदा गामा याना आव्हान दिले, त्यानुसार पटियाला च्या महाराजांनी २९ जानेवारी १९२८ रोजी हि निकाली कुस्ती जाहीर केली. २ विश्वविजेत्या मल्लांची हि कुस्ती पाहण्यासाठी जगभरातून गर्दी जमली, पण गामानी फक्त २मिनिटातच झेबिस्को यांचा पराभव केला. आणि पुन्हा एकदा कुस्तीच्या इतिहासात स्वतःच सर्वश्रेष्ठ मल्ल असल्याचं सिद्ध केलं.

शाहू महाराजांच्या तालमीत घडलेला हा मल्ल शाहुंच्याच विचाराचा होता. स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी झाली, गामा पाकिस्तानात गेले, पाकिस्तानात असलेल्या अनेक हिंदूंची कत्तल सुरी होती. अशावेळी गामांच्या तालमीत काही हिंदू मल्ल होते, काही स्थानिक गुंडांनी गाम याना धमकी दिली कि या हिंदूंना आमच्या हवाले करा, पण गामांनी साफ नकार दिला पहिल्यांदा माझ्याशी लढा आणि मग त्यांना ताब्यात घेऊन दाखवा असं आव्हान त्यांनी गुंडांना दिलं.

फक्त ताकदीनेच नाही तर विचारानी हि हा मल्ल ताकदवर होता. असा हा मल्ल कोल्हापूरच्या लाल आखाड्यात वास्तव्यास होता.

अशाच या कुस्तीपंढरी च्या वारकऱ्यांचा इतिहास आम्ही आपल्यासमोर मांडत जाऊ, फक्त आपली साथ राहूद्या….

 

– Team कुस्तीपंढरी

Bagha Aaba

Shubham Kothavle

 

 

You may also like...

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.