कोल्हापूरातील श्री अंबाबाई (महालक्ष्मीचा) नयनरम्य पालखी सोहळा

नवरात्रौत्सव काळात श्री महालक्ष्मी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो,विशेष करुन संध्याकाळ झाली की मंदिरात भाविक-भक्तांची रीघ वाढलेली असते, नगारखान्यातले सनई -चौघडयांचा ध्वनी निनादत असतो,सिद्धीविनायक गारेच्या गणपती समोर भावगीत -भक्तीगीतांच्या कार्यक्रम सुरु असतात, मंदिराच्या पाचही शिखरांबरोबर ,मंदिराच्या आवारातील परिसर विद्युत रोषणाईने उजळलेला असतो,तर गरुड मंडपात देवीच्या पालखीची विवीध फुलांनी सजावट केली जाते.

Mahalaxmi Pooja on 13-10-18 Captured by @vinayakmhetar

 

एव्हाना नऊ वाजायला आलेले असतात ,पालखी सोहळा पहायला मंदिर परिसरात अत्यंत गर्दी झालेली असते,साडेनऊ वाजले की देवीचे चोपदार ललकारी देऊन सालंकृत श्री जगदंबेची उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होते आणि मान्यवराँच्या पालखी पूजनाने चालू होतो नयनमनोहर पालखी सोहळा, पालखीमध्ये विराजमान झालेली जगत्जन्नी नारायणी ,त्याचबरोबर पालखी सोहळ्याची शोभा वाढवणारे छत्र -चामर,अब्दागिरी ,चौर्या -मोर्चेल राजलक्ष्मीचा जणू ऐश्वर्य दर्शवतात.पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते.

Palkhi  Captured by @viewfinder_beast

Palkhi Captured by @viewfinder_beast

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सूर एका तालात गर्जत असतो,वातावरणात धूपाचा सुगंध दरवळत असतो, भाविकांच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो,साक्षात जगत्जन्नी नारायणी भक्तजनांवर कृपादृष्टीयुक्त आशीर्वाद देत असते, भाविकांची पालखीवर अविरत पुष्पवृष्टी चालू असते,काही विशीष्ट ठिकाणी जगदंबेची पालखी थांबते तेथे परंपरागत नायकिणी गायन सेवा सादर करितात.पालखी सोहळ्याची सांगता होते ती गरुड मंडपामध्ये जगदंबा विसावा घेते, गरुड मंडपामध्ये गायन सेवा संपन्न होऊन ,तोफेची सलामी होऊन व चोपदारांची ललकारी होऊन जगदंबेची उत्सवमूर्ती गर्भगृहात नेऊन शंखतीर्थारती संपन्न होऊन ,शेजारती होऊन जगदंबा नारायणी निद्राधीन होते,आणि पालखी सोहळ्याची सांगता होते,असा हा आनंदाचा नवचैतन्याचा उत्साहाचा नऊ दिवस संपन्न होणारा नयनरम्य पालखी सोहळा अनुभवायला कोणाला आवडणार नाही !

Written By Multitalented Soham

Check out his profile here.

Mahalaxmi Mandir Drone view at Night Captured by @vinayakmhetar

 

You may also like...

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.