कोल्हापुरातील जिज्ञासा विकास मंदिर मधील दीवाळी

प्रेमाने व विश्वासाने सर्वकाही शक्य होत ते खरंचे.

मुले ही देवघरची फुले म्ह ते फुल कोणत्याही रुपात असो, जर आपण त्यांना प्रेमाने आपुलकीने समजलं तर ते ही आपल्याला तेवढ्याच प्रेमाने आपुलकीने समजू लागतात.

अश्याच आपुलकीने कोल्हापुरातील जिज्ञासा विकास मंदिर या शाळेतील विशेष मुलांनी(Special Child) करून धाकवले आहे.

प्रत्येक जण आपल्या कामात मग्न, दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जिज्ञासा विकास मंदिर शाळेच्या मुलांनी दिवाळी साठी आकाश- कंदील , पणत्या, उटणे बनवण्याचा उपक्रम केला आहे.

प्रत्येक जण आपल्या कामात दंग, कोणी कागद कापतो तर कोणी कागद चितकवतो, जसा आकाश कंदील तैयार होतो तोच तेज जणू त्या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो.

दिवाळी साठी कोल्हापूर जिज्ञासा विकास मंदिर आणि चेतना विकास मंदिर व राही पुनर्वसन केंद्र यांनी विशेष मुलांकडून दिवाळीसाठी आकाश कंदील, उटणे, पणत्या व लक्ष्मी पूजनाच्या पुडे तैयार करून घेतले…या उपक्रमातून मुलांना कौशल्य प्रशिक्षण व व्यवहारिक ज्ञान मिळेल या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

न्यूजीलंड, अमेरीम व ऑस्ट्रेलिया मधून मागणी

मुलांनी बनवलेल्या पणत्या, उटणे व आकाश कंदील ला परदेशातून प्रचंड मागणी असून ती वाढत आहे.

You may also like...

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.